राम कदम महिलांना मदत करणारे,आता वाद थांबवा-चंद्रकांत पाटील

दरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील

 नवी मुंबई, 07 सप्टेंबर : वाचाळवीर राम कदम यांच्या विधानवर अखेर भाजपने मौन सोडलंय. राम कदम यांनी त्यांच्या मतदार संघात महिलांची खूप मदत केलीये. आता त्यांनी माफी मागितली त्यामुळे आता तो विषय संपला असं सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी राम कदम यांची पाठराखण केलीय. पण राम कदम हे पक्ष प्रवक्ते पदावर राहणार की नाही यासंबंधीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.सार्वजणिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज सायन - पनवेल रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाच्या आधी बुजवू, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान इंदापूर हाय-वेचं कामही मार्च 2019 पर्यंत पूर्ण होईल पण सोबतच मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी मात्र 2019चा डिसेंबर महिना उजडणार आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. राम कदम यांनी माफी मागितली आहे. कदम यांचा मागची कारकिर्द मोठी आहे. त्यांनी अनेक महिलांना मदत केलीये. त्यांच्या मतदारसंघात हजारो महिला राखी बांधत असतात. त्यामुळे एखाद्या वाक्यामुळे इतका गदारोळ मांडायची आवश्यक्ता नाहीये. आता त्यांनी माफी मागितली विषय संपवला पाहिजे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राम कदम यांना पाठीशी घातलं. तसंच राम कदम प्रवक्तेपदावर कारवाई ही प्रदेश अध्यक्ष दानवे निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याबाबत खुलासा केला. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ मीडियांनी लावला, राजकीय संन्यास विषयच नाही, निवडणूक लढवणार नाही असे म्हटलो नाही. माझ्या निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्ष ठरवेल असं पाटील म्हणाले.दरम्यान, कॅबिनेट विस्तार हालचाल सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस याबद्दल अंतिम निर्णय घेतील अशी माहितीही पाटील यांनी दिली.दरम्यान, भाजपचे वाचाळवीर आमदार राम कदम यांना बडतर्फ केल्याशिवाय पुढचं आधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय. पोलिसांच्या पत्रकार परिषदेवरूनही त्यांना राज्य सरकारला धारेवर धरलंय.काय म्हणाले होते राम कदम ?तुम्ही कोणतही काम मला सांगा मी ते काम करणार असं सांगत त्यांनी त्यांचा फोन नंबर जाहीर केला. त्यावेळी त्यांनी जे उदाहरण दिलं ते त्यामुळं वाद निर्माण झाला. तुम्ही समजा एखाद्या मुलीला प्रमोज केलं आणि ती नाही म्हणाली तर मला सांगा. मी तेही काम करेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. त्यांनी हो म्हटलं तर मी तिला पळवून आणून तुम्हाला देईन, असं राम कदम यांनी म्हटलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

Trending Now