दोन डोंबिवलीकर तरूणांचं मलेशियात अपहरण; सुटकेसाठी एक कोटीची मागणी

व्यावसायानिमित्त मलेशियामध्ये गेलेले डोंबिवलीतल्या दोन तरूणांचं अपहरण झालंयं.

डोंबिवली, 6 ऑगस्ट : व्यावसायानिमित्त मलेशियामध्ये गेलेले डोंबिवलीतल्या दोन तरूणांचं अपहरण झालंयं. कौस्तुभ आणि रोहन वैद्य हे दोघे भाऊ डोंबिवलीत 'रॉक फ्रोझन फूड' नावाची कंपनी चालवायचे. काही दिवसांपूर्वी ते व्यवसायानिमित्त मलेशियामध्ये गेले होते. मात्र 2 ऑगस्टपासून वैद्य बंधूंचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. त्यामुळं त्यांचे कुटुंबिय आणि सहकारी चिंतेत आहेत.व्यवसायिक कारणानिमीत्त मलेशिया येथे गेलेल्या आणि डोंबिवलीत राहणाऱ्या या २ तरुणांचे अपहरण झाले असून, अपहरण झालेल्या या भावंडांच्या सुटकेसाठी २ ऑगस्टला एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी स्थानिक डोंबिवली पोलीस, ठाणे खंडणी विरोधी पथक आणि केंद्रातील काही तपास यंत्रणा करताहेत.दरम्यान, कौस्तुभ आणि रोहन वैद्य हे दोघे भाऊ जी 'रॉक फ्रोजन फूड' नावाची कंपनी चालवायचे, त्या कंपनीचे ऑफिस हे डोंबिवलीमध्ये देखील आहे. या दोन भावंडांनी मिळून त्यांचा हा व्यवसाय बऱ्यापैकी वाढवला. व्यवसाय आणखी वृद्धिंगत व्हावा यासाठी ते दोघे मलेशियात गेले होते. त्याठिकाणी एक नवीन प्लॅटफार्म ते उभारण्याच्या प्रयत्नात असताना दोघाचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. केंद्रातील तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास शिघ्रतेने करण्यासंदर्भात मलेशिया सरकारशी संपर्क साधला असून, तेथली तपास यंत्रणाही कामाला लागली असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी न्यूज18 लोकमतला दिली.

हेही वाचा..'मी वाचलो,पण आता मलाच त्रास होतोय'VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक! (संग्रहित फोटो) 

Trending Now