Home / News / mumbai /

Mumbai : मुंबईत मैदानाच्या नावावरुन भाजप-शिवसेनेत वाद, मालाडमध्ये मोठा गोंधळ

Mumbai : मुंबईत मैदानाच्या नावावरुन भाजप-शिवसेनेत वाद, मालाडमध्ये मोठा गोंधळ

मुंबईच्या मालाडमध्ये असलेल्या क्रीडासंकुल मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येणार आहे. याच नामकरणाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी प्रचंड गदारोळ बघायला मिळतोय.

मुंबईच्या मालाडमध्ये असलेल्या क्रीडासंकुल मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येणार आहे. याच नामकरणाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी प्रचंड गदारोळ बघायला मिळतोय.

मुंबईच्या मालाडमध्ये असलेल्या क्रीडासंकुल मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येणार आहे. याच नामकरणाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी प्रचंड गदारोळ बघायला मिळतोय.


मुंबई, 26 जानेवारी : मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतसं वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजप-शिवसेना यांच्यातील संघर्ष बघायला मिळतोय. मालाडमध्ये पुन्हा तसंच काहीसं बघायला मिळतंय. मुंबईच्या मालाडमध्ये असलेल्या क्रीडासंकुल मैदानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यांच्या या निर्णयाला एमआयएमनेदेखील पाठिंबा दिला आहे. पण भाजपकडून टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करण्यात येतोय. त्यामुळे भाजपकडून मालाडच्या मैदान परिसात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. या सर्व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. विशेष म्हणजे बजरंग दल संघटना देखील या आंदोलनात सहभागी झालेली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिसरात आंदोलकांकडून जोरजोराद घोषणाबाजी सुरु आहे.

दरम्यान, मालाडच्या क्रीडासंकुल मैदानात वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल फलक जागोजागी असल्याचं बघायला मिळतंय. याबाबत मैदान प्रवेशद्वारावरही अधिकृत फलक आहे. या मैदानाला पोलिसांनी गराडा घातला आहे. या मैदानात सध्या क्रिकेट सामना सुरु आहे. मुंबईच्या अनेक भागातील पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानाच्या नामाकरणाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडणार आहे. पण त्याआधीच भाजपकडून परिसरात आंदोलन सुरु झालंय. पोलिसांनी आंदोलकांना मैदानात जाण्याापासून रोखलं आहे. पोलिसांकडून आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. याशिवाय मैदानाला पोलिसांनी चहुबाजूंनी घेरलं आहे. पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैदानाच्या चारही बाजूला आहे.

बेस्ट बसची हवा काढली, वाहतूक कोंडी

तुमच्या शहरातून (मुंबई)

Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द

माहिम रेल्वे स्टेशनजवळ रुळावर आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

OBC Reservation: "जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या" शरद पवारांचं थेट मोदी सरकारला आव्हान

EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या राजकारणात तीन मोठ्या घडामोडी, केंद्रबिंदू राज्यसभेची उमेदवारी

BREAKING : हसीना पारकरचा बॉडीगार्ड होता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिक यांचा धक्कादायक जबाब

पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा

BREAKING: महाविकास आघाडीची 'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, 'या' मुद्द्यांवर चर्चा

Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार

Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मालाडमध्ये आंदोलन सुरु झाल्यानंतर काही अनपेक्षित घटना घडताना दिसत आहेत. मैदानाजवळ चौकात काही इसमांनी बेस्ट बसच्या चाकांची हवा काढली आहे. ही बेस्ट बस आपल्या मार्गाने जात होती. यावेळी काही जणांनी बेस्ट बस थांबवत चाकांची हवा काढली. विशेष म्हणजे काही जणांनी झोपून बसचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं सुरु आहे, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पण बसची हवा ही आंदोलकांनी की गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी काढली? हा प्रश्न उपस्थित होतोय.

(तुम्हाला व्हिडीओ कॉलमध्ये इंटरेस्ट आहे का? या वाक्याने अनेकांचं आयुष्य उध्वस्त!)

आंदोलकांची नेमकी भूमिका काय?

"भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वात आमचं आज आंदोलन होत आहे. अस्लम शेख यांनी टिपू सुलतान जे एक देशद्रोही आहे त्यांचं नाव मैदानाला देत आहेत हा हिंदूंचा आणि पूर्ण भारतवर्षचा अपमान आहे. जनता आणि भाजप युवा मोर्चा याचा स्वीकार करणार नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रात टीपू सुलतानचं काय योगदान आहे. ही शिवाजी महाराजांची नगरी आहे. शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे", अशी भूमिका आंदोलकांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

कार्यकर्ते रस्त्यावर झोपले

मैदानाला टिपू सुलतान यांच्या नामकरणाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. अनेक आंदोलक थेट रस्त्यावर झोपले आहेत. पोलीस या आंदोलकांना रस्त्यावरुन उठवत आहेत. पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरु आहे. या आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Published by: Chetan Patil
First published: January 26, 2022, 16:20 IST