अखेर 47 तासांनंतर राम कदम यांनी मागितली माफी!

मुंबई, 06 सप्टेंबर : भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी बोललेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर अखेर 47 तासांनी माफी मागितली आहे. 'माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे' असं लिहित त्यांनी ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. खरंतर राम कदम यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यभरात महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हे सगळं लक्षात घेता राम कदम यांनी माफी मागितली. त्यामुळे ही लाट आता शांत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.राम कदम यांचा ट्विटरद्वारे माफीनामा'माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे. '

 

डॅशिंग आणि दयावान आमदार अशी जाहिरात करणारे भाजपचे आमदार राम कदम तरूणींबद्दल केलेल्या विधानामुळं चांगलेच अडचणीत आले आहेत. सोमवारी दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी सर्वांना जाहीरपणे आपला मोबाईल नंबर दिला आणि तुम्हाला मुलगी पसंत आहे, पण ती नाही म्हणत असेल तर मला सांगा मी तिला पळवून आणून ती मुलगी तुम्हाला देईन असं राम कदम म्हणाले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला.अनेक ठिकाणी कदमांविरोधात जोडेमार आंदोलन केले. यात राम कदम यांच्या प्रतीकात्मक फोटोला बांगड्या भरण्यात आल्या तर अनेक ठिकाणी त्यांचे पुतले जाळण्यात आले. सातारा, जळगाव, धुळे या ठिकाणी सर्वात जास्त आंदोलनं करण्यात आली.या सर्व प्रकारात भाजपनं आधी राम कदम जे बोलले त्याची सीडी पाहिली जाणार त्यानंतर ते योग्य तो निर्णय घेणार असल्याचे समजते. पुण्यात राम कदम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितले. तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. PHOTOS : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेजवळ एकूण 10 गाड्यांचा विचित्र अपघात

Trending Now