झाले मोकळे आकाश, तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

घरी पोहोचल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन पवारसाहेबांचा आला, असंही त्यांनी सांगितलं.

Sonali Deshpande
मुंबई, 10 मे : झाले मोकळे आकाश, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलीये. केईएम रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. घरी पोहोचल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन पवारसाहेबांचा आला, असंही त्यांनी सांगितलं.२५ वर्ष मी सेनेसोबत होतो, त्यामुळे ऋणानुबंध असणारच आणि कठीण काळात साथ दिलेल्यांचे पंकजनं आभार मानण्यासाठी भेट घेतली, असं त्यांनी पंकज भुजबळ यांच्या मातोश्री भेटीवर म्हणालेत. आपल्या या काळात साथ दिलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानलेत.आज दिवसभर ते घरीच विश्रांती घेणार आहेत. उद्यापासून ते कार्यकर्त्यांना भेटी देतील, पण स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना नंतर लीलावती रुग्णालयात दाखल व्हावं लागणार आहे. स्वतः भुजबळांनीच ही माहिती दिलीय. घरी पोहचल्यानंतर तब्बल 2 वर्षांनंतर भुजबळ यांनी पुन्हा एकदा गळ्यात मफलर टाकलाय. जी त्यांची स्टाईल म्हणून ओळखली जाते.

Trending Now