पोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक

हा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते

नवी मुंबई, ११ सप्टेंबर- पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजता वाहतुक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांना चिरडून फरार झालेल्या ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली आहे. बाबूलाल मौर्य असं या ट्रेलर चालकाचं नाव असून त्याला उरणमधल्या जासई गावातून अटक करण्यात आली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज तपासून पोलिसांनी या ट्रेलर चालकाच्या मुसक्या आवळल्या. पहाटेच्या सुमारास वाहतूक नियंत्रित करत असताना भरधाव ट्रेलरनं घागरेंना चिरडलं होतं.पनवेल जवळील तळोजा एमआयडीसी येथे पहाटे ०३.३० वाजता वाहतुक पोलीस कर्मचारी अतुल घागरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटीवर होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतुल गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते.  अतुल घागरे यांची पत्नीही पोलीस खात्यात आहे. त्या रबाळे पोलीस ठाण्यात पोलीस आहे. तर ज्यादिवशी अतुल यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता.अतुल घागरे यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे एकंदरीतच वाहतुक पोलिसांवर असलेल्या कामाचा त्राण आणि त्यातून घडणाऱ्या घटना यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!

Trending Now