#MahaBudget2018 : बजेटमधील सर्व घोषणा आणि तरतुदी एकाच पेजवर

Sachin Salve
09 मार्च : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारच्या या शेवटच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. या बजेटमधील सर्व घोषणा... 1.    शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.2.    मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.

4.    जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटी 12 लक्ष रू. तरतूद. 5.    कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार आणि अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी 60 कोटींची भरीव तरतूद  अर्थव्यवस्था 1 अब्ज डॉलर्स करण्याचा निर्धार-  इंदू मिल स्मारकासाठी 150 कोटी ची तरतूद-  छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी 300 कोटी ची तरतूद6.    समुद्र किना-यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविणार. 7.    जलयुक्त शिवार अभियानासाठी 1500 कोटी एवढा विशेष निधी. 8.    मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण. ह्यासाठी 160 कोटी एवढा निधी. 9.    शेतक-यांना पीक व पशुधन याबरोबर उत्पन्नाचा नवीन स्रोत म्हणून वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ह्यासाठी 15 कोटी रू. निधी प्रस्तावित. 10.    शेतमाल साठवणूक सुविधा व प्रतवारीसाठी प्राधान्य देण्यासाठी नवीन योजना, बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसवणार व त्यासाठी 25 टक्के अर्थ सहाय्य पुरविणार. 11.    शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरून उत्पादन खर्च मर्यादित राहील ह्या उद्देशाने सेंद्रिय शेती- विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ह्या स्वतंत्र योजनेसाठी 100 कोटी रू. निधी. 12.    फलोत्पादन योजनेच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक लाभधारकांसाठी फळबाग क्षेत्राची मर्यादा कोकणात कमाल 10 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रात कमाल 6 हेक्टर पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय. 13.    कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देणार. 14.    मुख्यमंत्री कृषि आणि अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी रू. निधीची तरतूद.15.    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद 31.    संघ लोकसेवा आयोगातील सेवांमध्ये राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढवण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात रू. 2000 वरून रू. 4000 इतकी वाढ प्रस्तावित.  32.    अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या व वसतीगृहाच्या बांधकामाकरिता रू. 13 कोटी निधीची तरतूद. 33.    राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ति योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लक्षांवरून 8 लक्ष करण्याचे प्रस्तावित, ह्या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय, 605 कोटी रू. निधीची तरतूद. 34.    विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय ह्यांचे कल्याण ह्या विभागाकरिता 1 हजार 875 कोटी 97 लक्ष रू. निधीची तरतूद. 35.    थोर पुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा निर्णय, यासाठी 4 कोटीची तरतूद. 36.    महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक श्री. चक्रधर स्वामी ह्यांच्या नावाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अध्यासन केंद्र निर्माण करणार. 37.    अकृषि विद्यापीठांमध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून निर्माण करणार. ह्यासाठी 18 कोटी रू. निधीची तरतूद. 38.    मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 साठी भरीव तरतूद. 39.    मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोच्या विकासासाठी भरीव तरतूद. 40.    समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एप्रिल 2018 सुरू होणार. प्रकल्प 30 महिन्यांच्या अवधीत पूर्ण करण्याचे नियोजन. 56.    न्यायालयीन इमारतींच्या बांधकामासाठी 700 कोटी 65 लक्ष रू. निधीची तरतूद. 57.    मॅग्नेटिक महाराष्ट्रअंतर्गत देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूकदारांकडून 4 हजार 106 सामंजस्य करार प्राप्त. ह्याचे मूल्य रू. 12 लाख 10 हजार 400 कोटी असून सुमारे 37 लक्ष इतका रोजगार अपेक्षित. 58.    काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने शाश्वत व पर्यावरण पूरक काथ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन ह्यासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद. 59.    विविध हस्तकला कारागिरांची क्षमतावृद्धी करून हस्तकलेचा विकास करण्याचा निर्णय. ह्यासाठी 4 कोटी 28 लक्ष रू. निधीची तरतूद. 60.    मातीकला कारागीरांचा विकास व रोजगार निर्मितीसाठी संत गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला बोर्ड वर्धा येथे स्थापन करणार. ह्यासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद. 66.    पोलीस ठाणे आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी 165 कोटी 92 लक्ष रू. निधीची तरतूद. 67.    सीसीटीएनएस प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रातील गुन्हेगार व गुन्हेगारीची अचूक माहिती संकलित करत त्या माध्यमातून पोलिस ठाणी व न्यायालय तसेच अभियोग संचालनालय, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा ह्यांच्यात समन्वय साधण्यासाठी गुन्हे अन्वेषण संगणक प्रणाली विकसित करणार. ह्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद. 68.    समुद्र किना-यावर मच्छीमारी करणा-या मच्छीमार बोटींच्या सुरक्षेसाठी दोन अत्याधुनिक गस्ती नौका तैनात करणार. 69.    ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविणार. ह्यासाठी 335 कोटी रू. निधीची तरतूद. 70.    स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद. 71.    कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडला अनुदान देण्याचा निर्णय. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 72.    नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मल:निस्सारण ह्यासाठी राबविण्यात येणा-या अमृत योजनेसाठी 2 हजार 310 कोटी रू. निधीची तरतूद. 73.    स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील 8 शहरांसाठी 1 हजार 316 कोटी रू. निधीची तरतूद. 74.    सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी 900 कोटी रू. निधीची तरतूद. 75.    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 964 कोटी रू. निधीची तरतूद. 91.    अकाष्ठ वनौपज आणि औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 92.    अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी भरीव तरतूद. 93.    विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी 1 हजार 687 कोटी 79 लक्ष रू. निधीची तरतूद. 94.    श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 40% दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य वाढवून प्रतिमाह 800 रूपये तर 80% दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांना प्रतिमाह 1000 रूपये निवृत्ती वेतन देणार.95.    कर्णबधिर व बहुदिव्यांग आणि बौद्धिक दिव्यांग बालकांचे दिव्यंगत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी 'होय, कर्णबधिर बालक बोलू शकतात' आणि 'शीघ्र निदान हस्तक्षेप योजना' ह्या दोन नवीन योजना राबविणार. 96.    अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वसतीमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही नवीन योजना राबविणार. 97.    कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत आर्थिक मर्यादा वाढविण्याचा तसेच अनुदानाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय. 98.    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन, औरंगाबाद येथील वसतीगृह व सभागृह विस्तारीकरण आणि दुरुस्तीसाठी 2 कोटीचे अनुदान. 99.    दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही मोबाईल स्टॉल्स मोफत उपलब्ध करणार.. त्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद. 100.     राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ह्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून अभ्यासपूर्ण उपाय योजना सुचविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 101.    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक सभागृहे बांधणार. त्यासाठी 30 कोटी रू. निधीची तरतूद. 102.    आदिवासी उप योजना कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना, रस्ते विकास, विद्युतीकरण, आरोग्य, शिष्यवृत्ती योजना आदिंसाठी एकत्रित 8 हजार 969 कोटी 5 लक्ष रू. निधीची तरतूद. 103.    भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा क्र. 2 साठी 15 कोटी‌ रू. निधीची तरतूद. 104.    पेसा ग्राम पंचायतींना एकूण आदिवासी घटक कार्यक्रम नियतव्ययाच्या 5% थेट अनुदान देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 267 कोटी 88 लाख रू. निधीची तरतूद. 105.    आदिवासी‌ विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याच्या योजनेसाठी 378 कोटी रू. निधीची तरतूद. 106.    शामराव पेजे कोंकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी 25 कोटी रू. इतके अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करणार. 107.    अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध राज्यस्तरीय योजनांसाठी 350 कोटी रू. निधीची तरतूद. 108.    राज्यातील अल्पसंख्यांकबहुल ग्रामीण क्षेत्रांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 38 कोटी रू. निधीची तरतूद. 109.    प्रधान मंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे 2022 योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 75 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद. 110.    सार्वजनिक वितरण व्यवस्थांचे संगणकीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 5 कोटी 41 लक्ष रू. निधीची तरतूद. 116.    संरक्षित किल्ल्यांचे त्रिमित मानचित्रण (थ्रीडी मॅपिंग) करणार, ह्यासाठी भरीव निधीची तरतूद. 117.    गणपतीपुळे येथे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी  79 कोटी रकमेचा विकास आराखडा मंजूर. त्यासाठी 20 कोटी रू. निधीची‌ तरतूद. तसंच, माचाळ तालुका लांजा, जि. रत्नागिरी येथे नवीन पर्यटन स्थळ विकसित करणार. 118.    रामटेक या तीर्थ क्षेत्राच्या विकासाकरिता 150 कोटी रू. च्या विकास आराखड्यास मंजुरी. त्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद. 119.    कोकणातील मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद. 120.    सिरोंचा तालुका गडचिरोली येथील हजारो वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांच्या (फॉसिल्स) जतन, संरक्षण आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून सिरोंचा येथे जीवाश्म संग्रहालयाची स्थापना करणार. त्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 121.    अ. भा. मराठी साहित्य संमेलन व अ. भा. मराठी नाट्यसंमेलनासाठी देण्यात येणा-या अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय. 122.    हेरीटेज टूरीझम, मुंबई मेला व चेतक महोत्सव ह्या महोत्सवांसाठी आवश्यक उपाय योजना आणि पुरेशी तरतूद करणार. 123.    ख्यातनाम दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगुळकर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी ह्यांचे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 124.    कविवर्य मंगेश पाडगांवकर ह्यांचे वेंगुर्ला येथे तर ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी ह्यांचे सिंधूदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार. 125.    ऑटो रिक्षा चालकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 126.    शासकीय कर्मचा-यांच्या नेमणुकीपासून सेवा निवृत्तीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील सेवा विषयक बाबींसाठी सेवा सुलभीकरण ही व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करणार. ह्यासाठी 23 कोटी रू. निधीची तरतूद. 127.    अविरत व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुकर्मी योजना राबविणार. 128.    राज्य शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणार. ह्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद. 129.    ई- गव्हर्नन्स प्रकल्पासाठी 144 कोटी 99 लक्ष रू. निधीची तरतूद. 130.    सर्व परिवहन कार्यालयांत वाहन चालकांची चाचणी घेण्यासाठी राज्यात संगणकीय वाहन चालक चाचणी पथ उभारणार. ह्यासाठी 20 कोटी 92 लक्ष रू. निधीची तरतूद. 121.    अ. भा. मराठी साहित्य संमेलन व अ. भा. मराठी नाट्यसंमेलनासाठी देण्यात येणा-या अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय. 122.    हेरीटेज टूरीझम, मुंबई मेला आणि चेतक महोत्सव ह्या महोत्सवांसाठी आवश्यक उपाय योजना व पुरेशी तरतूद करणार. 123.    ख्यातनाम दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगुळकर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी ह्यांचे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद. 124.    कविवर्य मंगेश पाडगांवकर ह्यांचे वेंगुर्ला येथे तर ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी ह्यांचे सिंधूदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार. 125.    ऑटो रिक्षा चालकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.

Trending Now