मराठी बातम्या / बातम्या / मुंबई / 11 कामगार दुकानात झोपले अन् अचानक उडाला आगीचा भडका, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

11 कामगार दुकानात झोपले अन् अचानक उडाला आगीचा भडका, 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू


मुंबईतील साकीनामा परिसरात राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअरच्या दुकानाला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली

साकीनाका परिसरात एका हार्टवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे


मुंबई, 27 मार्च : मुंबईमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. साकीनाका परिसरात एका हार्टवेअरच्या दुकानाला आग लागली. या आगीत 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 9 कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या आगीत दुकान जळून खाक झालं आहे.

मुंबईतील साकीनामा परिसरात राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअरच्या दुकानाला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीच दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवासी (वय २३) अशी मृतांची नाव आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Mumbai News : गरिबांनी पोरींना शिकवू नये का? पीडितेच्या वडिलांचा उद्विग्न सवाल, अश्रू अनावर

BMC Hospital : बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली चिकटपट्टी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा

Kandivali crime : पत्नीशी अनैतिसंबंध असल्याचा लागला सुगावा; तरुणाचे मित्रासोबत धक्कादायक कृत्य

Mira Road Murder :3 बादल्या मांसचे तुकडे, प्रेशर कुकर आणि कटर, मीरा रोड हत्याकांडाची नवी माहिती समोर

Crime News: मुंबईत प्रियकराकडून सरस्वती वैद्यच्या शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवत मिक्सरमध्ये फिरवलं मांस

Thane News : आंबा झाला स्वस्त, आमरस करा मस्त! पाहा का घसरले दर, Video

Mumbai News : Rasika Sunil करणार Diet लग्न, मुहूर्तही ठरला! पाहा काय आहे प्रकार Video

Mumbai hostel Crime : मुंबई बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर; तरुणीची रुममेट..

Mumbai News : चेंबूरमध्ये बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली, 5 जण जखमी, घटनास्थळाचे PHOTOS

Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना; प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..

मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. या दुकानातच 11 कामगार झोपलेले होते. अचानक आगीच्या घटनेमुळे गोंधळ उडाला. शेजारी असलेल्या स्थानिकांनी तातडीने आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीच 11 कामगारांपैकी 2 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या मेहनतीनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

First published: March 27, 2023, 15:39 IST
top videos
  • Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video
  • Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण?
  • Thane News : आंबा झाला स्वस्त, आमरस करा मस्त! पाहा का घसरले दर, Video
  • Kalyan News : कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार, पाहा कसा झाला चिमुरड्या हर्षदाचा प्रवास, Video
  • ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स