कमला मिल आगीप्रकरणी 'वन अबव्ह'च्या दोन मॅनेजर्सना 9 जानेवारीपर्यंत कोठडी

केविन बावा आणि लोप्स अशी या दोन मॅनेजर्सची नावं आहेत. एन एम जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Sonali Deshpande
01 जानेवारी,मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी 'वन अबव्ह'च्या दोन मॅनेजर्सना अटक केलीय.   केविन बावा आणि लोप्स अशी या दोन मॅनेजर्सची नावं आहेत. एन एम जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय. त्या दोघांना भोईवाडा कोर्टात हजर केलं. आता त्यांना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाऊस या इमारतीमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी (29 डिसेंबर) रात्री घडलेल्या अग्नितांडवामध्ये 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.आग लागली त्या रात्री दोघंही तिथं हजर होते. त्यानंतर ज्या नातेवाईकांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली, त्यांना काल रविवारी अटक करून जामीन दिला होता.

‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पबमधील बेकायदा बांधकाम, आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती बैठकीत दिली.

Trending Now