VIDEO : गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा नरबळी!

चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्राम या दोन वर्षीय मुलाची नरबळीसाठी हत्या केल्याचं अखेर पोलीस तपासात समोर आलंय.

चंद्रपूर, 30 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्राम या दोन वर्षीय मुलाची नरबळीसाठी हत्या केल्याचं अखेर पोलीस तपासात समोर आलंय. 22 ऑगस्टला घराजवळुन खेळतांना बेपत्ता झालेल्या युगचा आठव्या दिवशी (29 ऑगस्ट) रोजी गवताच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडला होता. प्रमोद बनकर आणि सुनिल बनकर या दोन आरोपींनी गुप्त धनासाठी चिमुकल्या युगची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिलीय. दरम्यान, त्यांच्यावर खुनाचा तसेच अंधश्रध्दा निर्मुलन विरोधी अधिनियम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.युग मेश्राम या दोन वर्षीय मुलाचा नरबळीसाठी गळा दाबून हत्या केल्याचे अखेर पोलीस तपासात निष्पन्न झालंय. ब्रम्हपुरी तालुक्यात खंडाळा येथील ही घटना. 22 ऑगस्टला घराजवळुन खेळतांना बेपत्ता झालेल्या युगचा सहा दिवसानंतर काल तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह सापडला होता. प्रमोद बनकर आणि सुनिल बनकर या दोन आरोपींनी गुप्त धनासाठी चिमुकल्या युगची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपीवर खुनाचा तसेच अंधश्रध्दा निर्मुलन विरोधी अधिनियम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.ब्रह्मपुरी शहरापासून जवळच असलेल्या खंडाळा येथील युग आपल्या मोठ्या भावासोबत घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना २२ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला होता. पोलीस प्रशासन युगचा शोध घेत होते. युगचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गाव परिसरातील ओढे, विहिरी, नाले, खतांचे खड्डे पालथे घातले. पोलिसांनी युगच्या शोधासाठी त्याचे छायाचित्र असलेली पत्रकेही काढली होती. परिसरात, आजूबाजूचे पोलीस ठाणे आणि बाहेर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातही पाठविली होती.

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

Trending Now