हुंडा घेणार नाही-देणार नाही, उस्मानाबादमध्ये तरुण-तरुणींची शपथ

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील हजारो तरुण तरुणींनी हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही अशी शपथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतलीय.

Sonali Deshpande
21 एप्रिल : हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर समाजातील हुंडा ही अनिष्ट परंपरा दूर व्हावी यासाठी तरूणाईने पुढाकार घेतलाय. यासाठी मराठा समाजातील तरुण तरुणींनी पुढाकार घ्यायला सुरूवात केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील हजारो तरुण तरुणींनी हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही अशी शपथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतलीय.हुंड्यामुळे यापुढे एकाही शीतलचा बळी जाणार नाही, प्रसंगी यासाठी हुंड्याची चळवळ राबवण्याचा निर्धार तरुणांनी केलाय. प्रतिनिधिक स्वरूपात कळंब मधील शिवाजी चौकात ही शपथ घेण्यात आली.  हुंडा देणार नाही घेणार नाही किंवा देणार नाही यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम या तरुणांनी हाती घेतलाय. याची सुरुवात हे तरुण स्वतःच्या घरापासून करणार आहेत.

Trending Now