धक्कादायक! फवारणी करताना 123 जणांना विषबाधा, 6 शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर

कपाशीच्या पिकामधील तण आणि बोण्ड अळीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांची फवारणी करत असतांना १२३ शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

भास्कर मेहरे, प्रतिनिधीयवतमाळ, 12 सप्टेंबर : कपाशीच्या पिकामधील तण आणि बोण्ड अळीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांची फवारणी करत असताना १२३ शेतकऱ्यांना विषबाधा झाली. त्यापैकी २३ शेतकरी रुग्णांवर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यापैकी ६ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे.शेतकऱ्यांच्या या विषबाधेमुळे आरोग्ययंत्रणा हादरून गेली आहे. त्यामुळे आता विष फवारणी दरम्यान विशेष खबरदारीचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही यवतमाळ जिल्ह्यात ९०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. तर २२ शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे प्रशासनही हादरून गेलं होतं.

फवारणी करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या- फवारणी दरम्यान शेतकऱ्याने विशेष काळजी घ्यायला पाहिजे. अनेक प्रकारची कीटकनाशकांची मिश्रणं तयार करू नये.- फवारणी किट न वापरणं हे अतिशय धोकादायक आहे.- त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन प्रमाणापेक्षा जास्त पंप फवारे करू नये, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे. घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

Trending Now