पुण्यात घडला 'मुन्नाभाई' स्टाईल प्रकार,रुग्ण म्हणून भरती झाले रोजंदारी कामगार

एमआयएमच्या जागरूक नगरसेविका आशा लांडगे यांना संशय आला आणि खुलासा झाला की हे डी वाय पाटील संस्थेतील कामगार आहेत. काहीही आजार नसताना त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. बोगस केस पेपर बनवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बागडे हेही आश्चर्य चकित झाले त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Chittatosh Khandekar
पुणे 08 डिसेंबर: पुण्यातील येरवडा भागातील  पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात आज सकाळी अचानक 115 पेशंट भर्ती झाले.  विशेष म्हणजे हे रुग्ण नव्हते तर  रोजंदारी कामगार होते.एमआयएमच्या जागरूक नगरसेविका आशा लांडगे यांना संशय आला आणि खुलासा झाला की हे डी वाय  पाटील संस्थेतील कामगार आहेत. काहीही आजार नसताना त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. बोगस केस पेपर बनवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बागडे हेही आश्चर्य चकित झाले त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पण हा नेमका बोगस रुग्ण घोटाळा कशासाठी हे मात्र  अजून गुलदस्त्यात आहे.तसंच या सगळ्यामागे नक्की कोण  आहे  हेही कळत नाही. गेल्या काही दिवसात राज्यामध्ये बोगस डॉक्टरांचे आणि बोगस दवाखान्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे  या सगळ्याचं नक्की कारण काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  

Trending Now