'राम कदमांच्या घरी मुली -बाळी नाहीत का?' : साताऱ्यात विनोद तावडेंना घेराव घालत महिलांचा सवाल

सातारा, 5 सप्टेंबर : साताऱ्याच्या एका कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंना राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांसह घेराव घातला. राम कदमांवर कारवाई का करत नाही, असा संतप्त सवाल या महिलांनी तावडेंना  केला.अन्य काही भाजप नेते आणि मंत्र्यांनाही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अडवून राम कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली.दरम्यान, राम कदमांच्या त्या वादग्रस्त विधानावर भाजपा प्रदेश पक्ष संघटनेकडून विचारणा झाली. खुलाशासाठी संपूर्ण भाषणाची सीडी त्यांनी मागितली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज मुंबईत येणार आहेत.

मुलीला प्रपोज केलंय, पण ती नाही म्हणते. मदत हवी असेल तर मला फोन करा. तुमचे आईवडील पोरगी पसंत आहे म्हणाले,तर काय करणार मी? तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे वक्तव्य कदमांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचाच सर्वत्र विरोध होत आहे. राम कदमाचं नाव राम बदलून रावण ठेवा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीनेमकं काय म्हणाले कदम? पाहा हा व्हीडिओभारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईसाठी कदमांनी सातव्या थरापर्यंत पोहोचलेल्या गोविंदाला खाली उतरायला भाग पाडलं. गोविंदांचा अपमान झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन गोविंदा पथकासाठी की अजून कोणासाठी असा सवाल उपस्थितीत होत आहे.अखेर ट्विटरवरुन राम कदम यांनी व्यक्त केली दिलगिरीTeachers Day : आयुष्याला दिशा देणाऱ्या मान्यवरांचे ६ विचार

Trending Now