'सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला,घरात आई-वडिलानाही कळलं नाही'

सोलापूर, 11 सप्टेंबर : कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डॉल्बीवर कारवाई करणार असल्याचं पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी पत्रकारांना एका दुर्दैवी घटनेबद्दल सांगितलंय. मी मुंबईत दक्षिण मुंबईत अॅडिशनल सीपी होतो. तेव्हा 2007 रोजीची घटना आहे. एका सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. कफ परेडमध्ये ही घटना घडली होती. ज्या ठिकाणी या चिमुरडीवर अत्याचार झाले त्या दिवशी विसर्जन होतं. विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात आवाज होता. विसर्जनापासून जवळच एक झोपडी होती या झोपडीत चिमुरडीवर अत्याचार झाला होता. त्या झोपडीत फक्त एक पडदा होता. तिच्यावर अत्याचार झाले याचा तिच्या आई-वडिलांनी आवाज गेला नाही. असा थरारक अनुभव नांगरे पाटील यांनी सांगितलं.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामुळे डीजेबाबत आम्ही पहिल्यांदा जागृती, शिक्षण आणि नंतर अंमलबजावणी या टप्प्याने आम्ही काम करतोय. पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सुप्रीम आणि हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यात पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे अशी आठवण नांगरे पाटलांनी करून दिली. मी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

Trending Now