BIG BREAKING : विरेंद्र तावडेनं रचला होता दाभोलकरांच्या हत्येचा कट-सीबीआय

दाभोळकर हत्येचा कट वीरेंद्र तावडेने रचला होता. सचिन आणि शरदच्या मदतीने हा कट रचला होता

अजित मांढरे, मुंबई, 19 आॅगस्ट : डाॅ.नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली. त्याला पुणे शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे हल्लेखोर होते तर दाभोलकरांच्या हत्येचा कट विरेंद्र तावडेनं रचला होता अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली. तसंच सचिन आणि शरद सोबत आणखी दोघे जण होते. या प्रकरणी आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.सचिन अंदुरेला अटक केल्यानंतर त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सचिन अंदुरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी सचिन अंदुरेची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. गुन्हेगारांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र वाहन शोध घ्यायचा आहे यासाठी 14 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी वकिलांनी केली होती. तर सचिन अंदुरेच्या वकिलांनी आरोपी निष्पाप आहे. त्याचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं असून 6 महिन्याचे बाळ आहे. त्यामुळे त्याला 1 दिवस पोलीस कोठडी द्यावी असा युक्तीवाद केला. तसंच  सचिन अंदुरेला बकरा बनवण्यात आलाय. वीरेंद्र तावडे चार्जशीट मध्ये सारंग अकोलकर, विनय पवार यांची नावं मग सचिन अंदुरे थेरी कुठून आली असा प्रश्न सचिन अंदूरेच्या वकिलांनी केला. दोन्ही कडचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.या सुनावणी दरम्यान, सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. दाभोळकर हत्येचा कट वीरेंद्र तावडेने रचला होता. सचिन आणि शरदच्या मदतीने हा कट रचला होता. कट पूर्ण करण्याची जबाबदारी सचिन आणि शरदवर होती. त्यांच्यासोबत आणखी २ जण होते. दाभोळकरांवर सचिन आणि शरदनेच गोळ्या झाडल्यात. हत्येनंतर हत्येत वापरलेले हत्यारं आणि बाईक नष्ट केल्याचा संशय आहे अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी दिली. तसंच हा एक मोठा कट होता असा दावाही त्यांनी केला. सात दिवसांत सचिनची अजून चौकशी होणार आहे या चौकशीतून

लवकरच आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.10 जून 2016 रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्ता विरेंद्र तावडेला नवी मुंबईतून सीबीआयने अटक केली होती. पनवेलमध्ये विरेंद्र तावडेच्या घरी धाड टाकण्यात आली होती. सीबीआयने चौकशी अंती अखेर विरेंद्र सिंग तावडेंला अटक केली होती.  वीरेंद्र हा सनातनचा साधक आहे आणि हिंदू जनजागृती समितीशीही संबंधित आहे, असं कळतंय. तावडे हा डॉक्टर असून तो कान नाक घसा तज्ज्ञ आहे. सीबीआयनं वीरेंद्र आणि सारंग आकोलकर यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यानंतर हे दोघं ईमेलनं संपर्कात होते. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहे, हा एक समान दुवा आहे.दाभोलकरांच्या हत्येसाठी हवं होतं विदेशी पिस्तुल,तावडे-अकोलकरच्या ई-मेल्समधून खुलासागोवा बॉम्बस्फोटातला संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि तावडे या दोघांनी 2008 ते 2013 या कालावधीत एकमेकांना 200 इमेल्स पाठवले होते. दाभोळकरांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात या मेलमध्ये संभाषण झालं असल्याचं सीबीआयच्या सूत्रांमार्फत समोर येतंय. या कटाला "प्रोजेक्ट दाभोलकर" असं नाव देण्यात आलं होतं.तसंच दाभोलकरांची हत्या करण्यासाठी त्यांना विदेशी बनावटीची बंदूक हवी होती, कारण गावठी बनावटीच्या बंदूक निकामी होण्याची शक्यता असते. आणि त्यांनी ही जोखीम घ्यायची नव्हती. म्हणून त्यांना परदेशी बनावटीची बंदूकच हवी होती. तसंच ही बंदूक कोठून खरेदी करायची या संदर्भातही त्यांच्यात इमेलवरून संवाद झाल्याचे समोर आलंय.कोण आहे वीरेंद्र तावडे ?- तावडे मूळचा कोकणातल्या देवगड तालुक्यातील- तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ- पत्नीही वैद्यकीय व्यवसायामध्ये- सनातनचा साधक, हिंदू जनजागरण समितीशी संबंध- पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचं घर- तावडे जवळपास आठ वर्षं सातार्‍यात होतादाभोलकर हत्येप्रकरणाचा घटनाक्रम- 20 ऑगस्ट 2013 - पुण्यातील शिंदे पुलावर दाभोलकरांची हत्या- सनातन संस्था आणि जनजागरण समितीवर संशय- 5 महिन्यांनी मनीष नागोरी, विकास खंडेलवालला अटक- पोलिसांकडून तपासात फार प्रगती नाही- सीबीआयला तपास देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल- 9 मे 2014 ला तपास सीबीआयकडे वर्ग - 1 जूनला सीबीआयच्या पुण्यातील छाप्यात मिळाले धागेदोरे- सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे- छाप्यात काही संशयास्पद वस्तू CBI ला सापडल्या- छाप्यानंतर तावडे आणि अकोलकरचा ई-मेलवरून संपर्क- 10 जूनला तावडेला चौकशीसाठी बोलावलं- चौकशी पूर्ण झाल्यावर वीरेंद्र तावडेला अटक- 18 आॅगस्टला सचिन अंदुरेला औरंगाबादमधून सीबीआयने केली अटकVIDEO : जवान तुझे सलाम!, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट

Trending Now