'आईच्या अंत्यसंस्काराला येण्यासाठी मला वेळ नाही मी व्हिडिओ कॉल करते'

आता अंत्यसंस्कार करण्याची आधुनिक पद्धत देखील आली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण आता व्हिडिओ कॉलिंगद्वारे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आली आहे.

पालघर, 28 ऑगस्ट : हिंदू धर्मात मृत्यू झाल्यानंतर, मुलगा किंवा कुणीही चितेला अग्नी देण्याची प्रथा आहे. अनेक वर्षे लोक या परंपरेचे अनुसरण करत आहेत. मुलगा-मुलगी किंवा जवळच्या नातेवाईकांपर्यंत कोणीही असो जेव्हा आपल्यातलं कोणी दगावतं तेव्हा सगळेच जण धावून येतात. भारतात वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धती आहे. यात आता अंत्यसंस्कार करण्याची आधुनिक पद्धत देखील आली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण आता व्हिडिओ कॉलिंगद्वारे अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आली आहे.असाच एक अजब प्रकार महाराष्ट्राच्या पालघरमध्ये समोर आला आहे. जिथे एका मुलीने आपल्या आईचे अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलिंगद्वारे केले आहे. बरं इतकंच नाही तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आईच्या अस्थी मागवण्यासाठी मुलीने कुरियर सेवेसाठी अर्ज केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, पालघरच्या मनोरमध्ये 70 वर्षांचे  धीरज पटेल आपल्या 65 वर्षांच्या पत्नी निरीबाई पटेलसोबत एकटे रहायचे. त्यांची एकुलती एक मुलगी लग्नानंतर तुच्या सासरी गुजरातला राहते. मागच्या मंगळवारी निरीबाई यांचं निधन झालं. त्यावेळी निरीबाई यांचे पती धीरज पटेल घरी नव्हते. ते महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे गावातील जवळच्या मंडळींना आई गेल्याची बातमी त्यांच्या मुलीला फोनकरून सांगितली. पण गावी येण्यास वेळ नसल्याचं सांगत मुलीने गावकऱ्यांनाच आईवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले आणि मी व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यसंस्काराला उपस्थित राहते असं तिने गावकऱ्यांना सांगितलं.

य़ानंतर मुलीच्या आग्रहामुळे गावकऱ्यांनी नजीकच्या स्मशानभूमित निरीबाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्काराची सर्व विधी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुलीला दाखवली.खरंतर हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हे 16 संस्कारांमधला सगळ्यात शेवटचा संस्कार आहे. अंत्यसंस्कारावेळी वेद मंत्रांचा उच्चार केला जातो. पण या सगळ्याला माती देत मुलीने आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही वेळ नसल्याचं सांगितलं. या सगळ्यावर तुम्हालाही राग आला असेल इतकं नक्कीतच.गावकऱ्यांनीही मुलीच्या या वागण्यावर प्रचंड राग व्यक्त केला आहे. मंडळी आधुनिकता जर आपल्याला आपली नाती विसरायला लावणार असतील तर ही आधुनिकता नकोच असं म्हणायला हरकत नाहीये. बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

Trending Now