पोळा विशेष : या गावात वेशीवरील दरवाजातून उधळली जाते बैलजोडी!

जळगाव जिल्ह्यातील वराडसिम या गावात पारंपरिक आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो.

वराडसिम (जि. जळगाव), 9 सप्टेंबर : आज पोळा, म्हणजेच शेतकर्यांचा सवंगडी असलेला बळीराजाचा सण. आजच्या दिवशी त्यांना मानाने पुराणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांची पूजा केली जाते. प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक गावाची हा सण साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. जळगाव जिल्ह्यातील वराडसिम या गावात पारंपरिक आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी गाव दरवाजातून अर्थात वेशीवरल प्रवेशद्वारातून बैलजोडी उधळण्याची परंपरा या गावाने जोपासली आहे.भुसावळ तालुक्यातील वराडसिम या गावात पोळा हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणानिमित्त वराडसिम गावातील प्रत्येक व्यक्ती प्रवेशद्वारावर येऊन ऊभी राहते. गावाच्या वेशीवर असलेल्या प्रवेशद्वाराच्या अडीच बाय तीन फुटाच्या खिडकीतून बैल पोळा फोडण्याची आगळीवेगळी पद्धत येथे रूढ झाली आहे. कुणाचा बैल पोळा फोडणार? मानाचा शेतकरी कोण ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतं. पोळा या सणासाठी बाहेगावी गेलेले मंडळी हि गावी येतात. तालुकाभरातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होतात. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नारायण पाटील या शेतकऱ्याने स्वखर्चाने गाव दरवाजा उभारला होता पोळ्याच्या सणाला अडीच बाय तीन फुटांचं आकाराच्या खिडकीतून बैलाने उडी मारून पोळा फोडण्याची अनोखी परंपरा तेव्हापासून येधे सुरु झाली, ती आजही कायम आहे.वराडसिम येथे असा साजरा होतो पोळा

 

Trending Now