सिंचन घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हे दाखल!

नागपूर, ता. 17 जुलै :  विदर्भातील सिंचन घोटाळ्यात गोसेखुर्द प्रकल्पातील निविदा गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी कडून मंगळवारी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या आजीमाजी पाच अधिकार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. नागपूर जिल्ह्यातील अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन चे काम आणि गोसीखुर्द (बुज) उपसा सिंचन योजनेमधील गैरव्यवहारा प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत.एसआयटी मार्फत या सिंचन घोटाळ्याचा तपास सुरू आहे. मात्र न्यायालयाने तपासाबाबत असमाधान व्यक्त केले होते. याप्रकरणी तपास करत असेलेली एसआयटी नेमकी काय करत आहे, अशी विचारणा करत खंडपीठाने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आठवड्याभरात सिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देशही पाटबंधारे महामंडळला देण्यात आले होते. अँन्टी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कडून विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निवेदा प्रक्रीये दरम्यान व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक अँन्टी करप्शन ब्युरोला देण्यात आले होते.दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवरया प्रकरणात विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या तीन अधिकार्यांविरुद्ध यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात मंगळवारी आणखीन दोन जणांची नावे जोडल्या गेलीत आहेत. एसआयटीने या दोन जणांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत. तत्कालीन कार्यकारी अधिकारी वसंत गोन्नाडे, तत्कालीन विभागीय लेखाधिकारी अरविंद जिभकाटे, तत्कालीन अधिक्षक अभियंता दिलीप पोहेकर, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सुर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के अशी आरोपी आजी माजी अधिकार्यांची नावे आहेत. या प्रकरणात आणखीन काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.संभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण

अखेर अतुल भातखळकर यांनी मागितली माफी!

IndvsEng: शेवटच्या सामन्यात कोहलीचे ट्रम्प कार्ड

 

Trending Now