नुकतेच ट्विंकल खन्नानं इन्स्ट्राग्रामवर अक्षयसोबतचे फोटो शेअर केलेत. तीन फोटोज आहेत. एका फोटोत अक्षय कुमार समोर असलेल्या ग्रीन टीकडे आनंदानं पाहतोय.
मुंबई, 15 जुलै : उगाचंच अक्षय कुमारला खिलाडी म्हणत नाही. आपल्या कामात इतका व्यग्र असूनही तो आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो. क्वालिटी टाईम एकत्र घालवल्याचे फोटोज ट्विंकल आणि अक्षय सोशल मीडियावर शेअर करतात.
नुकतेच ट्विंकल खन्नानं इन्स्ट्राग्रामवर अक्षयसोबतचे फोटो शेअर केलेत. तीन फोटोज आहेत. एका फोटोत अक्षय कुमार समोर असलेल्या ग्रीन टीकडे आनंदानं पाहतोय. दुसऱ्या फोटोत रेस्टाॅरंटचा नजारा दिसतोय. तर तिसऱ्या फोटोत दोघांचे हसरे फोटो दिसतायत. ट्विंकलनं फोटोखाली कॅप्शनही लिहिलीय. त्यात तिनं म्हटलंय, अक्की ग्रीन टीकडे जेवढं प्रेमानं पाहतोय, काश त्यानं माझ्याकडेही पाहिलं असतं तर!सध्या अक्षय कुमार गोल्ड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा सिनेमा 15 आॅगस्टला रिलीज होणार. तर हाऊसफुल 4चं शूटिंगही लंडनला सुरू झालंय.