अणदूरच्या खंडोबा यात्रेचं 19 नोव्हेंबरला आयोजन

तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेचं 19 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.

Sachin Salve
15 नोव्हेंबर : तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेचं 19 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग) ही दोन वेगवेगळी गावे असून, या गावात चार किलोमीटरचे अंतर आहे.या दोन्ही गावात खंडोबाचे वेगवेगळी मंदिरे असली तरी देव मात्र एकच आहे.खंडोबाचे वास्तव्य अणदूरमध्ये सव्वा दहा महिने तर नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने असते. खंडोबाची मूर्ती एका गावाहून दुसऱ्या गावाला नेत असताना दोन्ही गावाच्या मानकऱ्यात लेखी करार केला जातो.

अणदूरची यात्रा 19 नोव्हेंबर रोजी पार पडल्यानंतर खंडोबाचे पावणेदोन महिन्याच्या वास्तव्याकरिता नळदुर्गकडे प्रस्थान होणार आहे.खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई बरोबरचा विवाह नळदुर्गमध्ये पार पडला होता, त्यामुळे या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. नळदुर्गमध्ये दर रविवारी यात्रा भरते तर मोठी यात्रा पौष पौर्णिमेला असते, या यात्रेस किमान सात लाख भाविक उपस्थित असतात. यंदा पाऊस भरपूर झाल्याने बोरी धरण तुडुंब भरले आहे, त्यामुळे भाविकांची सोय झाली आहे.अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमपहाटे काकड आरती सकाळी अभिषेकमहापूजादिवसभर नवससायास कार्यक्रमरात्री 12 वाजता छबिनामध्यरात्री 3 वाजता खंडोबाचे नळदुर्गकडे प्रस्थान20 नोव्हेंबर रोजी यात्रा कमिटीच्या वतीने जवाहर विद्यालयाच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.यात्रेनिमित्त अणदूरच्या खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Trending Now