तुळजाभवानीचं पेड दर्शनही महागलं, मोजावे लागणार 300 रुपये !

100 रूपयांऐवजी आता दर्शनासाठी 300 रूपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आलाय

Sachin Salve
16 सप्टेंबर : उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानीच्या सशुल्क दर्शनात आता वाढ करण्यात आलीये. 100 रूपयांऐवजी आता दर्शनासाठी 300 रूपये मोजावे लागणार आहेत.  मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आलाय. नवरात्र उत्सवाच्या काळासाठी ही दरवाढ करण्यात आलीय.नवरात्र उत्सवाच्या काळात म्हणजेच घटस्थापणे पासून आश्विन पोर्णिमे पर्यंत हे वाढीव दर आकारले जाणार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे दर्शन मिळणार आहे. मंदिरात पुजाऱ्याकडून किंवा सुरक्षा रक्षकाकडून दर्शन देण्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्याला पर्याय म्हणून मंदिर समितीने आणि नुतून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी 100 रुपये देऊन पेड दर्शन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. अगदी कमी कालावधीत भाविकांनी ही त्याला उत्सुफुर्त आणि चांगला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद पाहता आता जिल्हाधिकारी यांनी नवरात्र उत्सवाच्या काळात ही 100 रुपयावरून 300 रुपये दरवाढ केली आहे. नवरात्र संपल्यानंतर पुन्हा हे दर 100 रुपय केले जाणार आहेत.

Trending Now