तुकाराम मुंढेंचा नाशिक महापालिकेत दणका;पहिल्याच दिवशी 10 वाजता हजर!

तर असे तुकाराम मुंढे आज सकाळी 10च्या ठोक्याला आपल्या दालनात हजर होते. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर अनेक अधिकारी कचेरीत पोचलेच नव्हते. एरवी आरामात 11पर्यंत ऑफिसात येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंच्या या 'एन्ट्री'चा सगळ्या ऑफिसने धसका घेतला

Chittatosh Khandekar
नाशिक, 09 फेब्रुवारी:  पीएमपीएमएलमधून बदली झालेले आणि नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेले तुकाराम मुंढे आज  आपल्या दालनात 10च्या ठोक्याला हजर  झाले. पण यावेळी बाकीचे अनेक अधिकारी आलेच नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.तुकाराम मुंढे आपल्या प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची कार्यपद्धती अत्यंत कठोर असल्याची टीकाही त्यांच्यावर होते. पुण्याच्या पीएमपीएलचे व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पण कार्यकाल संपायच्या आधीच त्यांची बदली करण्यात आली. तीही नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून. हे पद नाशिकचं अत्यंत प्रतिष्ठेचं पद. तुकाराम मुंढे येणार याची वर्णी आधीच नाशिकमध्ये सोशल मीडियावर लागली होती. त्यांचं सोशल मीडियावरून तरूणाई स्वागतही केलं होतं. ते नाशिकात येत असल्यामुळे नाशिकचा गोदावरीचा ,प्रदुषणाचा प्रश्न सुटेल अशी आशा नाशिककरांना आहे.तर असे तुकाराम मुंढे आज सकाळी 10च्या ठोक्याला आपल्या दालनात हजर होते. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर अनेक अधिकारी कचेरीत पोचलेच नव्हते. एरवी आरामात 11पर्यंत ऑफिसात येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंच्या या  'एन्ट्री'चा सगळ्या ऑफिसने धसका घेतला. सगळ्या ऑफिसमध्ये धावपळ सुरू झाली. अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.

Trending Now