मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, कोकणात जाण्याआधी जाणून घ्या LATEST UPDATE

सध्या गणेशोत्सावाची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक उत्सवासाठी गावी चालले आहेत. यासगळ्याचा परिणाम म्हणजे सगळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड - मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मोठी वाहतुक कोडी़ झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्री पासुन पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ३-४ किमीपर्यंत वाहतुक कोडीं झाली आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक सुरुळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस काम करतायत.

मुबंईहुन पुण्याकडे आणि कोकणात गणपतीसाठी जाणा-या प्रवाश्यांची सख्यां मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्त्यावर गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रीपासुनच बोरघाटात ३-४ किमीची वाहतुक कोडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अम्रतांजन ब्रिजपासुन पुण्याकडे जाणा-या मार्गावरही वाहतुक कोडी आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या जागीच खोळंबल्या आहेत. यात प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रॅफिकचा सामना करायचा नसेल तर वेळेच तुमचे नियोजन करा. आणि शक्यतो रेल्वेनं प्रवास करा.

Trending Now