'जगात जर्मनी,पेट्रोलच्या किंमतीत परभणी',शंभरीला फक्त 11 रुपये दूर !

 पंकज क्षीरसागर,07 सप्टेंबर : देशभरात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे राज्यातील विविध शहरात वेगवेगळ्या दरामुळे आज नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणीत विकले जात आहेत. जिल्ह्यात पेट्रोल हे ८९.२४ रुपये तर डिझेल ७७.१३ पैश्यांनी नागरिकांना खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांनी यावर संताप व्यक्त केलाय.परभणी शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवरून आज पेट्रोल ८९.२४ पैसे, डिझेल ७७.१३ तर भारत पेट्रोलियमच्या पंपांवर हेच पेट्रोल ८९.२७ आणि डिझेल ७७.१५ रुपये,इंडियन ऑइल पेट्रोल ८९.१६,डिझेल ७७.०४ प्रति लिटरने परभणी करांना खरेदी करावे लागत आहेत. जे राज्यभरातील सर्वच शहरांच्या मानाने सर्वात जास्त आहे.

ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत असून त्यामुळे वाहतुकीचे दर ही वाढवले जात आहेत जे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यानं ही वाढणारी इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत परभणीकरांनी यावर संताप व्यक्त केलाय.दरम्यान, आजही इंधन महाग झालं आहे. पेट्रोलचे दर 48 पैशांनी तर डिझेल 56 पैशांनी वाढले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी आज 87 रुपये 45 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेल 76 रुपये 57 पैसे लीटर आहे.इंधनाचे आजचे दर (रुपये प्रतिलिटर)मुंबई -पेट्रोल - 87.45डिझेल - 76.57पुणे -पेट्रोल - 87.20डिझेल - 75.15रत्नागिरीपेट्रोल = 88.43डिझेल = 76.37नाशिक -पेट्रोल - 87.77डिझेल -75.71कोल्हापूरपेट्रोल - 87. 57डिझेल - 75.57धुळेपेट्रोल 87.36डिझेल 75.32नांदेडपेट्रोल - 88.94डिझेल - 76.86वाशिमपेट्रोल-87.99डिझेल-75.94अमरावतीपेट्रोल -88.70डिझेल -77.85नंदुरबारपेट्रोल - 88.55डिझेल - 77.69वर्धापेट्रोल - 87.25डिझेल - 75.15अकोलापेट्रोल - 87.47डिझेल - 75.45

Trending Now