महाराष्ट्रातून जुन्या नोटांची डिलिव्हरी थेट सुरतला, 1 कोटी जप्त

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार इंदूर पोलिसांनी 3 लोकांना एक कोटी रुपयांची जुन्या नोटांची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आलं आहे.

इंदूर, 17 ऑगस्ट : एटीएसने दिलेल्या माहितीनुसार इंदूर पोलिसांनी 3 लोकांना एक कोटी रुपयांची जुन्या नोटांची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघंही औरंगाबादवरून 1 कोटी रुपये घेऊन सुरतला पळून जाण्याच्या तयारीत होते. या धाडीत 1000च्या 83 लाख आणि 500च्या 17 लाख जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.पकडलेल्या तीन आरोपींपैकी हबीब खान अहमदाबादचा राहणारा आहे. भूसावळचा सैय्यद इमरान हा एमआर आणि प्रॉपर्टी व्यवसायिक आहे. तर सुरतचा सैय्यद शोएब हा साडीच्या दुकानावर काम करतो, अशी माहिती एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली आहे. एटीएसने दिलेल्या फोटोंच्या आधारे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.दरम्यान, या तीनही आरोपींची चौकशी केली असता त्यातून कमिशनचं प्रकरण समोर आलं आहे. मात्र ते पैसे कोणाचे होते आणि कोणाला देण्यासाठी ते सुरतला जात होते याची माहिती अद्याप हाती लागलेली नाही. पोलीस याबाबतचा कसून तपास करत आहे. नोटबंदीला वर्ष उलटलं असलं तरी जुन्या नोटांचा सुळसुळात काही थांबलेला नाही.

VIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

Trending Now