शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त पालकांची सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला मारहाण

सलसाडी शासकिय आश्रम शाळेत इलेक्ट्रीक बॉक्सचा शॉक लागून शाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

निलेश पवार, नंदुरबार, 27 आॅगस्ट : सलसाडी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा डिपीचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पअधिकारी विनय गौडा यांच्यासह तळोदा तहसिलदारांना पोलीस मारहाण केली. या घटनेत गंभीर मार बसला असून आदिवासी विकास विभाग, महसूल आणि पोलीस विभागाचे जवळपास सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेवेळी पोलीस फौजाफाटा घटनास्थळी तैनात असतांना देखील झालेल्या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुळातच कोट्यवधी रुपये खर्च करुन आश्रमशाळेतील तोकड्या असुविधांचा विद्यार्थी बळ ठरत असल्याने पालकांच्या संतापाचा आता उद्रेकात रुपांतर होतांना दिसत आहे.  नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा आदिवासी प्रकल्पातील सलसाडी शासकीय आश्रशाळेतील शिकणाऱ्या सचिन चंद्रसिंग मोरे या विद्यार्थ्याचा आज सकाळी सहाच्या सुमारास वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पाण्याची मोटार चालू करण्यासाठीची डिपी सुरू करण्यासाठी हा विद्यार्थी गेल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर संतप्त गावकरी आणि पालकांनी आश्रमशाळेत जमा होऊन घटनेतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्या शिवाय विद्यार्थ्याचा मृतदेह न उचलण्याची भूमिका घेतली. यानंतर दहाच्या सुमारास प्रकल्प अधिकारी विनय गौडा तहसिलदार  योगेश चंद्रेसह पोलीस बंदोबस्तात आश्रमशाळेवर गेले. यावेळी पालकांच्या संतापाचा उद्रेक होऊन त्यांनी या दोघे अधिकाऱ्यांना मारहाण केली. यात या दोन्ही अधिकाऱ्यांना गंभीर मुका मार लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामांन्य रुग्णालयात हलवण्यात आले. यातील आयएएस अधिकारी असलेल्या गौडांना तर अंगावर गंभीर जखमी झाल्या आहेत.  विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतांना देखील झालेल्या या हल्याबद्दल पोलीस दलावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पंधरा दिवसांपूर्वीच डिबीटीच्या मुद्यावरुन नंदुरबार प्रकल्प अधिकारी वान्मंती सी यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला होता. पंधरा दिवसांच्या आता दोन आयएएस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्लामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्रमशाळांमध्ये कोट्यवधी रुपये खर्चकरुन ही असुविधांमुळे विद्यार्थ्याचा होत असलेल्या मृत्यूने पालकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

 VIDEO : 'डब्बू अंकल' इज बॅक, मिथुनच्या गाण्यावर तुफान डान्स

Trending Now