राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

तब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत.

मुंबई, 06 आॅगस्ट :  तब्बल 19 लाख तृतीय आणि चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढचे 3 दिवस मंत्रालयातला कारभार ठप्प राहणार असल्याचं कळतंय. तसंच सरकारी शाळा, रूग्णालंय आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयांच्या कामकाजावरही या संपाचा विपरीत परिणाम होणार आहे.विविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान संप पुकारलाय. शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली.सातव्या वेतन आयोगाची जानेवारी -2019 पासून अंमलबजावणी करण्याचा आणि 4 हजार कोटींची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र सरकारनं थकीत महागाई भत्त्याच्या स्वरूपात 10 हजार कोटी मंजूर करण्याची मागणी करत संपाचं हत्यार उपसलंय. तसंच नोकरभरतीवरची स्थगिती उठवण्यात यावी ही देखील कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

उद्या कोणत्या सेवा ठप्प ?- शासकीय शाळा (महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका शाळा)- मंत्रालय- महापालिका- जिल्हा परिषद कार्यालय- नगरपालिका कार्यालय- तलाठी कार्यालय- सरकारी रुग्णालयेसंपात कोण सहभागी होणार ?- सगळ्या शासकीय शाळांमधले कर्मचारी- रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी- राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटना- कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय, मुंबई ------------------------------------------------------------हेही वाचाVIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण

शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप

VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Trending Now