दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

"आमचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येकालाच म्हणायचं असतं आम्हीही म्हणतो की आमचा मुख्यमंत्री व्हावा.."

Sachin Salve
कोल्हापूर, 20 जून : आम्हाला वाटतं आमचाच मुख्यमंत्री व्हावा, पण 2019 ला निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री दोघांनी मिळून ठरवूया असं प्रतिउत्तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं.शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं म्हटलं होतं. त्यावर आज कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

 'पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच'

शिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं ?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

विशेष म्हणजे, पालघर पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेत आणि भाजपात संबंध ताणले गेले होते. त्यावेळी शिवसेनेसोबत युती टिकवून ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं नेहमी दिसून आलं. कारण जर भाजप आणि सेनेची युती तुटली तर पुन्हा काँग्रेसचं सरकार येईल, आणि असं झालं तर काय होईल याचा जनतेने अनुभव घेतलाच आहे. त्यामुळे युती टिकून राहणं महत्त्वाचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसंच आम्ही युती तुटलीच नाही असंही त्यांनी पाटील यांनी सांगितलं होतं.

Trending Now