अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला

आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

Sachin Salve
  सागर सुरवसे, सोलापूर 17 मे : आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.हातानं मैला उचलण्याचं काम सुरू आहे, ते अशिया खंडातली एक नंबरची ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीमध्ये. इंदिरानगर वसाहतीमध्ये बळवंत कुचेकर आणि मच्छिंद्र जाधव हे सफाई कामगार हातानं सार्वजनीक शौचालयाच्या टाकीतला मैला काढतायेत.

ग्रामपंचायतीच्या नोकरीत असणाऱ्यांनाच हे काम करावं लागत असल्यानं,आता ही प्रथा बंद करण्याबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी हे काम करायला सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केलीय.एकीकडे आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत असल्याचे अभिमानाने सांगणाऱ्या अकलूजमध्ये दिव्याखाली अंधार अशीच काहीशी स्थिती आहे. त्यामुळे या अमानवी कृत्याची दखल प्रशासन घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय.

Trending Now