गावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मश्रूम गणपतीची महती मोठी असून हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे.

सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर,ता.11 सप्टेंबर : आजपर्यंत आपण मोदक खाणारा गणपती ऐकला असेल मात्र सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या मश्रूम गणपतीची महती मोठी असून हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. बाराव्या शतकामध्ये श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी सोलापूर शहर आणि परिसरावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी अष्टविनायकांची स्थापन केली. त्यापैकी एक विनायक म्हणजे मश्रूम गणपती. सोलापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेहिप्परगा गावात या गणपतीची स्थापना केली. या गणपतीचं वैशिट्य म्हणजे त्याला दाखवला जाणारा प्रसाद. त्यावरूनच त्याचे नाव मश्रूम गणपती असे ठेवण्यात आलेय...श्रींची मूर्ती सव्वा तीन फुट उंच, रेखीव, सुबक आणि स्वयंभू असून मंदिराची नित्य पूजाअर्चा स्वर्गीय किसनराव पतंगे यांच्या चौथ्या पिढीकडे आहे. त्यांच्याकडून रोज धार्मिक विधी पार पाडले जातात. इथं कायम भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.मश्रूम गणपतीचे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे. तुळजापूर, पंढरपूरसह पर राज्यातूनही अनेक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला साकडं घालण्यासाठी येत असतात.

काही भक्त असेही आहेत की जे केवळ त्याच्या सेवेसाठी नित्यनेमाने मंदिरात येतात...एकावेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल पण त्यांची गणपतीची आरती मात्र कधीच चूकत नाही.हेही वाचा...

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

बुद्धी आणि शौर्याचं प्रतिक, कुलाबा किल्ल्यातला सिद्धिविनायक

कृष्णा नदी तीरावरील वाईचा 'ढोल्या' गणपती

गावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी

गावाकडचे गणपती : लिंबासूरापासून मुक्ती देणारा बीड जिल्ह्यातला 'लिंबागणेश'

Trending Now