नवरात्रीसाठी राज्यातील तीर्थक्षेत्रं सज्ज

नवरात्र असल्याने तुळजापुरात रस्ते दुरुस्तीची अनेक कामं केली जात आहेत. भाविकांसाठी दर्शन रांग, मंडप, पार्किंग याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत

Chittatosh Khandekar
19 सप्टेंबर: महाराष्ट्रातला नवरात्रोत्सव 21 सप्टेंबरला सुरू होत आहे असल्याने देवीच्या नवरात्र मोहत्सवासाठी राज्यातील शक्तीपीठ सज्ज आहेत. त्यातच तुळजापूर आणि कोल्हापूरही सजत आहेत.कुलस्वामिनी आई तूळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव २१ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. नवरात्र असल्याने तुळजापुरात रस्ते दुरुस्तीची अनेक कामं केली जात आहेत. भाविकांसाठी दर्शन रांग, मंडप, पार्किंग याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तर मंदिर परिसर ही स्वच्छ करून घेण्यात आला आहे. एसटीच्या सुविधा असतील किंवा पोलीस बंदोबस्त ही सगळी तयारी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे मंदिर परिसरात हळद कुंकू देवीची माळ कवड्याची माळ परडी यांनी दुकानं सजली आहेत. नवरात्र मोहत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.तर दुसरीकडे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. अगदी मंदिर रंगवण्यापासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंतची सगळी स्वच्छता पूर्ण झाली आहे.

एकंदरच नवरात्रासाठी महाराष्ट्रातील मंदिरं सज्ज आहे.

Trending Now