शिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं ?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

युती टिकून राहणं महत्त्वाचं आहे, असं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, आमची युती तुटलीच कधी होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Renuka Dhaybar
कोल्हापूर, ता. 26 मे : शिवसेनेसोबत युती टिकवून ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं नेहमी दिसून आलं. कारण जर भाजप आणि सेनेची युती तुटली तर पुन्हा काँग्रेसचं सरकार येईल, आणि असं झालं तर काय होईल याचा जनतेने अनुभव घेतलाच आहे. त्यामुळे युती टिकून राहणं महत्त्वाचं आहे, असं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, आमची युती तुटलीच कधी होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला.पालघर निवडणुकीमुळं भाजप आणि शिवसेनेत कटूता निर्माण झाली पण शिवसेना भाजप युती तुटली कुठं असा सवाल चंद्रकातं पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केला आहे. आज कोल्हापूरमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.कुणावर अन्याय झाला की त्याला उचलायचे ही शिवसेनेची स्टाईल आहे. त्यांच्यावर सरकार हा चित्रपटही निघाला त्याप्रमाणं शहानिशा न करता उद्धव ठाकरेंनी वनगा यांच्या मुलाला उचलंल आणि त्याचा अर्ज भरला अशी घणाघाती टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर दोन्ही पक्षांची युती तुटणार नसून मैत्रीत मनाला लागणारं राजकारण शिवसेनेनं केलं असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Trending Now