शनी शिंगणापूरच्या ट्रस्टवर राज्य सरकार पाहारे'दार'

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवरच आता शनी शिंगणापूरचं ट्रस्टही राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणार आहे.

Ajay Kautikwar
अहमदनगर,ता .20 जून : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवरच आता शनी शिंगणापूरचं ट्रस्टही राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे.शिंगणापूरच्या या नव्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष, कोषपाल आणि ९ सदस्य असणार आहेत. या व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. या निर्णयावर शनी शिंगणापूरच्या देवस्थान ट्रस्टने आमचा कारभार आधीपासून पारदर्शक असल्याचं सांगत तुर्तास तरी थेट विरोधी प्रतिक्रिया देणं टाळलंय.शरद पवारांचा 'खास' निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला!

कोणाच्या वरदहस्तामुळे घरतला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट?ज्या शिंगणापुरात गावकऱ्यांनी शनिदेवाच्या भरवशावर घराला साधे दरवाजेही लावलेले नाहीत. त्याच शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा, यासाठी सरकारने तिथं नवं ट्रस्टी मंडळ स्थापन्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हे ट्रस्टी शनिभक्त असणे बंधनकारक आहे बरं...आता हा निकष नेमका कसा तपासला जाणार हे सरकारलाच ठाऊक, पण आणखी एक श्रीमंत देवस्थान सरकारने ताब्यात घेतलंय हे मात्र, नक्की.सध्याच्या देवस्थान ट्रस्टीने मात्र, आमचा कारभार पारदर्शकच असल्याचं सांगत या निर्णयावर थेट टीका करणं सध्यातरी टाळलंय.

अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ

अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

शनि शिंगणापूरचा देशभरात खूप मोठा भक्तवर्ग आहे. दरवर्षी तिथे लाखो भक्त दर्शनाला येतात. मध्यंतरी महिला प्रवेश बंदीवरूनही हे देवस्थान चर्चेत आलं होतं. पण ग्रामस्थांनी ट्रस्टवर गावातल्याच महिलेची नियुक्ती करून या वादावर पडदा टाकला.असं असलं तरी शनिभक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय, आता भक्त म्हटलं म्हटलं की देणगी आलीच. आजमितीला या ट्रस्टची आर्थिक उलाढालही कोट्यावधींच्या घरात आहे. भक्तांच्या या देणगीचं रक्षण व्हावं. म्हणून दार नसलेल्याबात शनि शिंगणापुरात सरकार पहरेदार असणार आहे.   

Trending Now