नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 9 वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे.

अहमदनगर, 22 जुलै : नगर-सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चारच्या सुमाराला स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 9 वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील रहिवासी आहेत. प्रवासादरम्यनान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात 5 जणांचा जीव गेला आहे.रविवारी सकाळी 4 वाजता नगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारामध्ये हा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर येथून नेवासाकडे जात होती. तर ट्रकही सोलापूरच्या दिशेने जात होता. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला

 अपघातात मृत झालेल्या 5 जणांची नावे1) दगडू आनंदा भणगे2) बाळासाहेब लक्ष्मण माळवदे3) रमेश भाऊसाहेब कातोरे4) द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे5)   हनुमान अंबादास दुसेदरम्यान, सत्यम रमेश कातोरे या 9 वर्षाच्या जखमी मुलाल ओम हॉस्पिटल जामखेड येथे उपचारसाठी भरती करण्यात आलं आहे.आहे.हेही वाचा...नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

PHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद ?

Trending Now