शिक्षकाचे अश्लील चाळे, विद्यार्थिनीकडे केली शरीरसुखाची मागणी आणि आता...

भातकुली येथील शोभालाल राठी विद्यालयातील सुरेश ठाकूर या 50 वर्षीय शिक्षकाने त्याच शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

अमरावती, 11 सप्टेंबर : भातकुली येथील शोभालाल राठी विद्यालयातील सुरेश ठाकूर या 50 वर्षीय शिक्षकाने त्याच शाळेतील 15 वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरेश या शिक्षकाने त्याच्या विद्यार्थीनीला शरीर सुखाची मागणी केली तर ही बाब कोणाला सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकीही सुरेश यांनी केली.हे सगळं जर कोणाला सांगितलं तर मी तुला शाळेतून काढून टाकेन आणि इतर कोणत्याही शाळेत तुला अॅडमिशन घेऊन देणार नसल्याची धमकी या शिक्षकाने आपल्या विद्यार्थीनीला दिली. पण या सगळ्या घाबरून न जाता या विद्यार्थीनेने शाळा प्रशासनाकडे यांसदर्भात तक्रार केली पण तक्रार देऊनही कारवाई न केल्यानेअखेर काल भातकुली पोलीस ठाण्यात यांसंर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भातकुली पोलीस ठाण्यात शेकडो गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत तक्रार दाखल केली.  या शिक्षकाविरोधात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आपली पोल खोल झाली असल्याचं लक्षात येता हा शिक्षक फरार झाला आहे. त्यामुळे आता पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

दरम्यान, यापूर्वीसुध्दा या शिक्षकाने असे प्रकार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र त्यावेळीदेखील शाळा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही आणि त्यामुळे त्याची इतकी हिम्मत वाढली असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!

Trending Now