विजेच्या पोलवर काम करत होता कर्मचारी, वीज सुरू झाल्यामुळे मृत्यू

धोंडीराम गायकवाड यांचा विजेच्या पोलवर काम करत असताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.

Sachin Salve
20 नोव्हेंबर : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यात वीज वितरण कंपनीचा कर्मचारी धोंडीराम गायकवाड यांचा विजेच्या पोलवर काम करत असताना अचानक वीज सुरू झाल्याने शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.साताऱ्यातील कराड तालुक्यात निगडी या गावात ही घटना घडली. या प्रकरणी घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले आणि जो पर्यंत जे दोषी आहेत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह खांबावरून खाली घेणार नसल्याचा पवित्रा देखील ग्रामस्थांनी घेतला होता.मुख्य वीज वाहिनीचे काम सुरू असताना अचानक वीज सुरू झालीच कशी असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. मात्र पोलिसांनी योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 2 तासांनी मृतदेह खाली घेण्यात आला.

या घटनेचा तपास कराड पोलीस करत आहेत.  मयत वायरमन धोंडीराम यांचे मुळ गाव करवडी असून वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्यांचा हकनाक बळी गेला आहे.

Trending Now