सांगली मतमोजणी केंद्रावर गोंधळ, ४ हजार प्रतिनिधी थांबले गेटवरच

सांगली महापालिकेच्या मतमोजणीला थोड्याचवेळात सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर गोंधळ सुरू झालेला दिसतो

सांगली, ०३ ऑगस्ट- सांगली महापालिकेच्या मतमोजणीला थोड्याचवेळात सुरूवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर गोंधळ सुरू झालेला दिसतो. सुमारे ४ हजार प्रतिनिधींना पोलीस मतमोजणी केंद्रात आत सोडत नसल्यामुळे गोंधळ सुरू झालेला आहे. आता प्रतिनिधी गेटवर थांबले आहेत. दरम्यान सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज थोड्याच वेळात निकाल लागणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दोन्ही महापालिकेच्या एकून १५३ जागांसाठी ७५४ उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. या निवडणुकीत सरासरी अंदाजे ५७ टक्के इतकं मतदान झालंय. यात सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी ६२ टक्के तर जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागातील ७५ जागांसाठी अंदाजे ५५ टक्के मतदान झालंय. सांगलीत ११ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.सांगली महापालिका निवडणूक २०१८ साठी एकूण ७८ जागासाठी ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणातकाँग्रेस - ४४

राष्ट्रवादी - ३४काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी - ७८भाजपा - ७८शिवसेना - ५६अपक्ष विकास महाआघाडी - ४३स्वाभिमानी विकास आघाडी - २०सांगली जिल्हा सुधार समिती - २१हम भारतीय पार्टी - ३एम आय एम - ८जळगाव महापालिकेचं पक्षीय बलाबल एकूण जागा - ७५खान्देश विकास आघाडी (सुरेशदादा जैन) - ३३भाजप - १५मनसे - १२राष्ट्रवादी - ११जनक्रांती पार्टी - ०२महाराष्ट्र विकास आघाडी - ०१अपक्ष - ०१

Trending Now