पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलला सनातनचा पुन्हा विरोध

महाराष्ट्र सरकार मात्र तरुणांना बिघडवतंय असा सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा आक्षेप आहे.

Sachin Salve
03 आॅक्टोबर : सनबर्न फेस्टिव्हलला सनातन संस्थेनं पुन्हा विरोध केलाय. 29 ते 31 डिसेंबर या दिवसांत देहू आणि आळंदीच्या मध्ये असलेल्या मोशीमध्ये हे फेस्टिव्हल होणार आहे.पुण्यात मागील वर्षीही झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू सघटनांनी विरोध केला होता. याही वर्षी या फेस्टला विरोध दर्शवण्यात आलाय.  या फेस्टमध्ये दारू, ड्रग्जचा वापर होतो, तसंच अश्लील नाच केले जातात. तुकोबा आणि माऊलांच्या भूमीत अनैतिकता आणि व्यभिचाराला प्रोत्साहन देणारा उत्सव आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका सनातनने घेतलीये.एकीकडे मोदी तरुणांना घडवत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मात्र तरुणांना बिघडवतंय असा सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा आक्षेप आहे.

Trending Now