स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीला संघाचा नकार !

Sachin Salve
नागपूर,05 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच भाग असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाला रेशीमबागेतील स्मृतीमंदिर परिसरात इफ्तार पार्टी आयोजित करण्यास नकार दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आता यावर सारवासारव करत पंधरा आॅगस्टच्या आसपास ईदमिलनचा आणि  2019 मध्ये इफ्तार आयोजित करू असं आश्वासन संघाने दिलाय.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लीम समुदायाशी फारसे जुळवून घेत नाही अशा पद्धतीचा सर्वसाधारण समज खोडून काढण्यासाठी संघाच्याच मुस्लीम राष्ट्रीय मंचतर्फे गेल्या काही काळापासून देशभरात इफ्तारचे आयोजन करण्यात येत आहे.  सामाजिक समरसतेचा देशभर संदेश देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबागच्या स्मृतीमंदिर परिसरात इफ्तार आयोजनाला संघाने नकार दिल्याने मंचाने नाराजी व्यक्त केली आहे.या वादावर पडदा टाकण्यासाठी आता संघाच्या वतीने पुढील वर्षी इफ्तार करू आणि आँगस्ट मध्ये ईद मिलन घेऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. पण मुस्लिम राष्ट्रीय मंच ही स्वतंत्र संघटना आहे त्याला संघ फक्त मार्गदर्शन करतो असे संघाच म्हणन आहे.

संघाच्या स्मृतीमंदिर परिसरात इफ्तार साजरी होत नसल्याने संघाच्या जवळ गेलेल्या मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी आहे.प्रखर हिंदुत्वाचा प्रसार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना बोलावून विरोधी विचारांच्या लोकांसोबत संवाद करत असल्याचा संदेश दिलाय. पण आता संघाचाच भाग असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने इफ्तार होत नसल्याने संघाच्य़ा सामाजिक समरसतेच्या भुमिकेवर उघड नाराजी व्यक्त केल्याने मंचाने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

Trending Now