कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येण्याची चिन्हं

जारकीहोळी बंधूंसह काँग्रेसचे 14 आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

बेळगाव १२ सप्टेंबर- बेळगावच्या पीएलडी बॅंकेच्या राजकारणामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जारकीहोळी बंधूंनी अपमानाचा सूड घेण्यासाठी १४ आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रमेश जारकीहोळी यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आलीय. १५ दिवसांत काहीही घडू शकते, असं सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. पीएलडी बॅंकेच्या निवडणुकीवरून पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची बाजू उचलून धरली होती. यामुळे हेब्बाळकर यांच्या गटाचे पदाधिकारी बॅंकेत विजयी झाले. जारकीहोळी बंधूंना ही बाब पटली नसल्याने ते पक्षालाच आव्हान देण्याच्या विचारात आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत त्यांनी सूत्रे हलविण्यास सुरूवात केल्याचे समजते. भाजप प्रवेशासाठी रमेश जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्यासमोर चार अटी ठेवल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद, सहा आमदारांना मंत्रिपद, पोटनिवडणुकीचा खर्च भाजपने करावा शिवाय मतदारसंघांना अतिरिक्त अनुदान द्यावे अशा अटी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापुढे ठेवल्यात. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात नवा भुंकप येण्याची चिन्ह गडद झाली आहेत.डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेपास सतीश जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला असून, आमच्या जिल्ह्याचे राजकारण कसे करावयाचे आम्हाला चांगले माहीत आहे, पुढील १० वर्षांत आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

Trending Now