फेसबुकवरून झालं प्रेम, बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल

नागपूरात फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे.

नागपूर, 03 ऑगस्ट : नागपूरात फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडिओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सतीश संजय रामटेके या २१ वर्षीय गरोबा मैदान परिसरात राहणाऱ्या तरूणास यास अटक केली.Jalgaon Corporation election 2018 निकालाचे LIVE अपडेटपीडित १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सतीशशी ओळख झाली. तिच्या म्हणण्यानुसार सतीशने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून जाळ्यात ओढलं. ती बीबीएची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील रिक्षा चालक आहे. सतीश टवाळखोर असून व्यसनी आहे. पीडित विद्यार्थिनी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सतीशने तिला प्रभावित करण्यासाठी मोबाईल भेट दिला.

Sangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान१ जुलैला सतीशने तिला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावलं. घरी त्याचे कुटुंबीय असतील असे समजून ती त्याच्या घरी गेली. परंतु घरी सतीश एकटा होता. युवतीच्या तक्रारीनुसार सतीशने तिला पिण्यासाठी पाणी दिले. पाणी पिल्यानंतर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सतीशने तिच्यावर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप तयार केली. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.हेही वाचा...मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खानPHOTOS : इंग्लंडच्या 'रन'भूमीत विराटचा नवा विक्रममराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा

Trending Now