साताऱ्यात अनोखे रक्षाबंधन, बहिणीने स्वतःची किडनी भावाला देऊन वाचवले प्राण

रक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस

विकास भोसले, सातारा, २५ ऑगस्ट- देशभरात रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्याची लगबग सुरु आहे. भावाला काय भेटवस्तू द्यायची या विचारात आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील एका बहिणीने भावाला एक अशी भेटवस्तू दिली जी आजन्म त्याच्याजवळच राहील. सचिन गोसावी या तरुणाला त्याच्या बहिणीने स्वतःची किडणी देऊन आपल्या भावाची खऱ्या अर्थाने रक्षा केली.रक्षाबंधन... भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजय नगर इथे राहणारे सचिन गोसावी यांचे सात जणांचे कुटुंब गेली २ वर्ष मरण यातना भोगत आहेत. शेत जमीन नाही, रोजगार व मासेमारी करुन पोट आलेला दिवस ढकलला जातो.सगळा भार घरातील कमवता मुलगा सचिन याच्यावरच. मात्र सचिनला मासेमारी करत असताना दोन वर्षांपुर्वी सर्पदंश झाला आणि गरिबीमुळे योग्य उपचार न झाल्याने दोन वर्षात सचिनच्या दोनही किडन्या पूर्ण निकामी झाल्या. २ वर्षे डायलेसिस सुरु असल्यामुळे त्याच्या वडिलांना राहते घरदेखील विकावे लागले. मात्र आपला तरुण मुलगा दररोज मरणाच्या दारात असल्याचे दु:ख बाप पाहत होता.

समाजात मालमत्तेवरुन भाऊ बहिणीत कटुता निर्माण होण्याची अनेक उदाहरणं डोळयासमोर असताना, सुवर्णाने रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला यमाच्या दारातून परत आणण्यासाठी केलेली धडपड नक्कीच प्रेरणादायी आहे.VIDEO : 'रॅम्बो' त्याच्याजवळ येऊन थांबला आणि खुनी सापडला

Trending Now