चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार

'चंद्रकांत पाटील हे आता आताच राजकारणात आले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा आहे'

परभणी, 08 जुलै : चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले गेले मी ४ मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केलाय, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीय तर मुंबईला दुधाचा एक थेंबही पुरवठा होऊ देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.राजू शेट्टी आज परभणीत होते. यावेळी त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पीक विमा आंदोलनकांची भेट घेऊन हा विषय दिल्लीत अधिवेशनात मांडणार असल्याचं सांगत दूध आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केलीय.

'दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?'

तसंच राज्यातील शेतकऱ्यांकडून कोण ठेकेदारी घेतं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अधिक काही बोलायला लागले तर मला बरंच काही बाहेर काढताय येईल असंही राजू शेट्टी म्हणाले.तसंच दूध बंद आंदोलन शंभर टक्के होणारच आहे. महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांनी निर्णय घेतला असून जर कुणी जबरदस्ती केली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

Trending Now