याआधी राज आणि पवारांमध्ये कशी रंगली होती जुगलबंदी?

पवार आणि ठाकरे कुटुंबीयांचे जुने संबंध. पण स्वतःचा पक्ष काढल्यापासून राज ठाकरेंनी पवारांवर वेळोवेळी टीका केलीये.

Sonali Deshpande
अमेय चुंबळे, 21 फेब्रुवारी : राज ठाकरे आज पुण्यात शरद पवारांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. पण यापूर्वी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा शाब्दिक हल्ले चढवलेत.पवार आणि ठाकरे कुटुंबीयांचे जुने संबंध. पण स्वतःचा पक्ष काढल्यापासून राज ठाकरेंनी पवारांवर वेळोवेळी टीका केलीये. राजकारणात यशस्वी होण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं, असा सल्ला पवारांनी दिली होता. या सल्ल्याला मार्च 2006मधल्या आपल्या पहिल्याच सभेत राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं होतं.मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना राज यांनी पवारांच्या राजकारणाचा गलिच्छ असा उल्लेख केला होता.

पवारांनी तर अनेकदा राज ठाकरेंच्या टीकेला पोरकट असं म्हटलेलंय. पवारांच्या राजकीय भूमिकेवर राज ठाकरेंएवढी खमंग टीका क्वचितच कुणी केली असेल.पण पवारांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी पवारांवर स्तुतिसुमनं उधळली होती. टीका करायचं हे व्यासपीठ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.एका राजकीय मुलाखतीबाबत याआधी क्वचितच एवढी उत्सुकता निर्माण झाली असेल. आता कोण कुणाला शब्दात पकडतं, ते आज संध्याकाळी कळेलच 

Trending Now