कोकणातल्या कंत्राटदारांना आपल्या पद्धतीनं जाब विचारा- राज ठाकरे

कोणत्या जमान्यात राहत आहोत. परमेश्वराला माना, पण चेटूक बिटूक काही नसतं

मुंबई, ०८ सप्टेंबर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे कोकणवासीयांचा एक मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक प्रमुख मुद्यांना त्यांच्याशैलीत हात घातला. कोकणातले प्रश्न, उद्योग, रस्ते यांसारख्या प्रश्नाचा राज यांनी समाचार घेतला. कोकणवासीयांना संदेश देत राज म्हणाले की, कोकणातील लोकांनी जमिनीवर आणि समुद्रावर लक्ष ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी द्रष्टेपणाने समुद्रावर लक्ष केंद्रीत केले. नेमकी त्यांच्या याच गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केले. ‘कोकणानं महाराष्ट्राला भारतरत्न मिळवलेल्या व्यक्ती दिल्या, कलाकार दिले, नावाजलेले पत्रकार दिले. पण आम्ही काय करतोय गणपतीपुरतं कोकणात येतोय. वाडी-बिडी बघायची आणि परत यायचं. यापलीकडे कोकणात तुम्ही काय बघताय?’, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.यावेळी राज यांनी न विसरता आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ज्यांनी मदत केली त्या महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि सी स्केप महाडचे ट्रेकर्सचे कौतुक केले तसेच त्यांच्या कार्याबद्दल राज यांनी त्यांचा सत्कारही केला. यानंतर त्यांनी भाषणाला सुरूवात करत, 'कोकणातील माणसं कोकणातल्या घाटासारखी आहेत. अनेकदा आढेवेढे घेतात पण बोलण्यात त्यांच्या नादी लागू नये.'कोकणात येऊ घातलेल्या प्रकल्पांबद्दल बोलताना राज म्हणाले की, ‘हे सर्व प्रकल्प कोकणाची वाट लावणारे आहेत. असले प्रकल्प दुसरीकडेही  हलवता येऊ शकतात. त्यासाठी कोकणच्या जमिनीचीच गरज आहे असे नाही. यापेक्षा पर्यटनावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. केरळची भूमी कोकणासारखीच आहे. पण केरळ पर्यटनात किती पुढे गेलाय. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागतं. कोकणातल्या लोकांना पर्यायाची गरज आहे. कोकणातले नवे रस्ते उखडलेलेच आहेत. तिथल्या कंत्राटदारांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. नाशिकचे कंत्राटदार आम्हाला घाबरून असायचे. म्हणून तिथल्या रस्त्यांवर खड्डे नाहीत. कोकणातल्या कंत्राटदारांना तुम्ही आपल्या पद्धतीनं जाब विचारला पाहिजे. इथल्या लोकांना आपण आहोत याचा आधार वाटला पाहिजे.'

गणपतीला जाताय, तर तुमच्या गावातल्या मनसैनिकाला बळ द्या. कोकणातल्या प्रत्येक गावात मनसेची शाखा सुरू झालीच पाहिजे, असं आवाहन त्यांनी कोकणातल्या कार्यकर्त्यांना केलं. मनसे स्थापन झाल्यानंतर पहिलं यश कोकणातून आलं. खेडमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळालं. त्यामुळे यापुढच्या यशाची सुरुवात कोकणातूनच होईल, असा विश्वास राज यांनी कोकणवासीय मनसैनिकांना दाखवला. तसेच देवदेवस्कीसारखे प्रकार अजूनही कोकणात होतात असा अनेकांचा समज आहे. यावर बोलताना राज म्हणाले की, 'चेटूक बिटूक काही नसतं. आपण कसले चेटूक फेटूक घेऊन बसलोत? कोणत्या जमान्यात राहत आहोत. परमेश्वराला माना, पण चेटूक बिटूक काही नसतं.’आता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान

Trending Now