पुण्यात गोदामाला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू

पुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.

Sachin Salve
पुणे, 14 मार्च :  शिवाजीनगरमध्ये एका खासगी प्रेस आणि गोदामाला भीषण लागली होती. या आगीत 2 जणांचा मृत्यू झालाय.पुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या आग दाखल झाल्या होत्या. पहाटे ही आग आटोक्यात आली. या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. या आगीत प्रेस आणि गोदाम जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलं नाही.

 

Trending Now