195 चा टोल आता 230 रुपयांना, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टोलधाड सुरू

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये 18 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 195 च्या टोलसाठी आता 230 रुपये मोजावे लागणार आहे.

Sachin Salve
01 एप्रिल : मुंबई पुणे प्रवास आजपासून महागला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये 18 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 195 च्या टोलसाठी आता 230 रुपये मोजावे लागणार आहे.टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन देऊन सरकार सत्तेवर आलं आहे. मात्र टोल बंद होण्या ऐवजी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ केली जाईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती, असं सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या नियमानुसार आता यामध्ये 35 रूपयांची वाढ झाली असून हलक्या वाहनांसाठीचे टोलचा दर 230 रूपयांवर पोहचला आहे. यापूर्वी २०११ मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलचे दर वाढवण्यात आले होते.

जुने दरनवे दर
चार चाकी         195रु.230रू.
मिनी बस          300355
ट्रक   418493
बस572675
 

Trending Now