पुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप

त्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.

Sachin Salve
29 डिसेंबर : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी तब्बल तळीरामांनी ३ लाख ७१ हजार वैयक्तिक एक दिवसाचे परवाने मिळवले आहे.पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दारू पिऊन सोलिब्रेशन करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यंदा १ दिवसाच्या दारू पिण्याच्या परवान्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.या परवान्याचं वितरण हे बारमालक आणि एव्हेंट ऑर्गनायजर यांना करावं लागणार आहे. जवळपास १५० विशेष कार्यक्रमांना परवानगी ही उत्पादनशुल्क विभागाने दिलीये.

Trending Now