आईसमोर मुलीचा कारमध्ये होरपळून मृत्यू

पिंपरी-चिंचवड, 10 सप्टेंबर : पिंपरीमध्ये एका कारला आग लागल्यानं गाडीमध्ये असलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या कार दुर्घटनेतून मृत महिला संगिता हिवाळे यांचा भाऊ, आई आणि मुलगा थोडक्यात बचावला.घटनेच्या वेळी या कारमध्ये मयत महिला संगीता हिवाळे यांचा ,भाऊ,आई आणि मुलगाही होता. हे सर्व जण रुग्णालयात जात होते. मात्र भुजबळ चौकाजवळील सर्व्हिस रोडवर गाडीने अचानक पेट घेतला. तेव्हा आई,भाऊ आणि मुलगा बाहेर पडले,मात्र संगीता यांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही. आणि त्यांचा गाडीत जागीच होरपळून मृत्यू झाला.

या सर्व घटनेचा वाकड़ पोलीस तपास करतायत मात्र गाडीने पेट घेण्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. -----------------------PHOTOS : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा!;राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

Trending Now